मोबाईल हॅक झाला तर काय कराल?
What to do it your Mobile is Hacked?
आज आपण एकविसाव्या शतकात पदार्पण
करताना टेक्नॉलॉजीचा वापर करायला शिकलो आहोत . त्यात मोबाईल वापरणाऱ्यांचे प्रमाण
वाढले आहे .आज आपण आपला मोबाईल जर हॅक झाला तर काय उपाय करायचे व तो हॅक
होण्यापासून कसा वाचवायचा यासंदर्भात आपण माहिती करून घेणार आहोत .
आज टेक्नॉलॉजी
एवढी पुढे गेली आहे की आपण पन्नास टक्के सुद्धा उपयोग करून घेत नाही त्यात
हॅकिंगचे प्रकार खूप वाढले आहेत .समजा तुमचा मोबाईल जर हॅक झाला ज्याने तुमच्या
मोबाईल हॅक केलाय तो तुमच्या मोबाईल मधला पूर्ण डेटा चोरून घेऊ शकतो .तुमच्या सर्व
फोटो, फाईल आणि इतर महत्वाचे डॉक्यूमेंट ची माहिती सहज मिळू शकतो .
मोबाईल
हॅक झाला तर काय कराल?
आता आपल्याला समजले असेल की मोबाईल
हॅक झाल्यावर किती नुकसान होऊ शकते ?आपल्या बँकेचे खाते सुद्धा रिकामे होऊ शकते.
मोबाईल
हॅक कसा होतो?
1) बऱ्याच वेळेला आपण आपल्या मोबाईल
मध्ये फ्री ॲप इंस्टॉल करतो यामध्ये हॅकिंग ॲप इन्स्टॉल झाल्यावर हे ॲप आपोआप hide होतात हे ॲप hide झाल्यामुळे आपण
आपल्या मोबाईल मध्ये बघू शकत नाही .हे ॲप काढून टाकायचे असेल तर यूएसएसडी कोड माहिती असावा लागतो आणि हा
कोड फक्त जाणे हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल
केलेले आहे त्यालाच माहिती असते म्हणून ,आपला मोबाईल दुसऱ्याकडे देताना विचार करावा.
2) आपल्या मोबाईलवर(OTP) वन टाइम पासवर्ड जर आला असेल यामुळे आपल्या कॉल ची पूर्ण माहिती हॅकर घेऊ शकतो. किंवा एखादी लिंक आपल्याला पाठवू शकतो या लिंक वर जर क्लिक केले तर काही सेकंदात तो आपला पूर्ण डेटा चोरी करू शकतो.
3)आपल्या मोबाईल मध्ये जर एखादे
unknown ॲप आपण इन्स्टॉल करत असाल तर ,असे ॲप आपल्या मोबाईल मधल्या काही गोष्टींची
परवानगी मागते उदाहरणार्थ लोकेशन स्टोरेज ,फोन, मेसेज अँड कॉन्टॅक्ट ,मॉडीफाय सिस्टीम
सेटिंग ,चेंज वायफाय कनेक्टिविटी ,चेंज ब्लूटूथ कनेक्टिविटी या जर आपण allow केल्या
तर यामुळे सुद्धा आपला फोन हॅक होऊ शकतो. या ॲपमुळे आपण काय सर्च करतो ,आपण कोणत्या
सोशल मेडिया साइट्स उदाहरणार्थ व्हाट्सअप, फेसबूक, ट्विटर,इंस्टाग्राम वर आपण कुणाशी
आणि काय चाट केले तसेच बँक डिटेल, अकाउंट नंबर, युजरनेम आणि पासवर्ड या सारखा डेटा
सुद्धा चोरी होऊ शकतो.
4)जे प्रोफेशनल हॅकर्स असतात त्यांना
कोणत्या ॲप ची किंवा ओटीपी ची गरज पडत नाही. हा हॅकर आपला मोबाईल किंवा कम्प्युटर च्या
माध्यमातून फोन हॅक करू शकतो आणि असे करणे म्हणजे कायद्याचा भंग करणे आहे .यामुळे जेल सुद्धा होऊ शकते.
तसे पाहिले तर आपल्या नॉलेज चा उपयोग चांगल्या कामासाठी
न करता चुकीच्या कामासाठी केला जातो .सायबर क्राईम मध्ये जर आपण गुन्हा नोंदवला तर
असे हॅकर्स लगेच पकडले जातात.
5)बऱ्याच वेळेला आपण सार्वजनिक ठिकाणच्या वाय-फायचा
उपयोग करतो असा वापर आपण टाळला पाहिजे .तसेच आपले ब्लूटूथ पासवर्ड प्रोटेक्टेड असले
पाहिजे .आपले शेअरिंग चे काम झाले असेल तर लगेच ब्लूटूथ बंद केले पाहिजे .
6)आपल्या मोबाईलची बॅटरी जर लवकर संपत
असेल तर त्याची अनेक कारणं आहेत फ्री ॲप आपण
इन्स्टॉल केल्यावर त्याच्या माध्यमातून बॅकग्राउंडला मालवेअर सुरू असतात आणि त्यामुळे
ते आपला डेटा खात असताना बॅटरी लवकर संपते.
वरील सर्व गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील तर आपण या पासून आपला फोन कसा वाचवू
शकतो या संदर्भात माहिती घेऊयात .
समजा वरील पैकी काही गोष्टी आपल्या
फोनच्या बाबतीत दिसत असतील तर आपला फोन एफ.डी.आर(FDR) फॅक्टरी डेटा रिसेट करावा
लागेल.
एफ
.डी .आर .कसा करायचा ?
एफ .डी .आर करण्याअगोदर आपल्या मोबाईल
मधले महत्वाचे ॲप्स ,फोटो, व्हिडिओ आणि महत्वाचे डॉक्युमेंट्स याचे बॅकअप घेणे आवश्यक
आहे. बॅकअप घेतल्यानंतरच एफ.डी.आर करावयाचे आहे. 1)सुरुवातीला आपल्या फोन सेटिंग मध्ये
जा
2)यानंतर अबाउट फोन मध्ये जा यामध्ये
तुम्हाला बॅकअप अँड रिसेट असे ऑप्शन दिसेल .
3)रीसेट या ऑप्शन वर क्लिक करा.
4) फॅक्टरी डेटा रिसेट वर क्लिक करा
.
5) रिसेट फोन वर क्लिक करा थोड्या वेळ
वाट बघा .आपला फोन पूर्णपणे हार्ड रिसेट झालेला असेल.
(असे सेटिंग या फोनच्या मॉडेल नुसार
बदलेले असतात.)
फोन हॅक होऊ नये यासाठी काय कराल?
1)आपल्या फोनची काळजी घेणे आवश्यक आहे
.यात आपला फोन पासवर्डने लॉक असला पाहिजे .
2)आपल्या मोबाईल मध्ये चांगल्या कंपनीचा
अँटीव्हायरस असला पाहिजे.
3) सार्वजनिक ठिकाणच्या वाय-फायचा वापर
शक्यतो टाळावा.
4) कोणतेही ॲप डाऊनलोड करताना गुगल
प्ले सारख्या सुरक्षित ठिकाणावर वरून ॲप डाऊनलोड करा .
5)ॲप डाऊनलोड करताना हे आपल्या मोबाईलच्या
कोणकोणत्या परवानग्या मागते हे नीट वाचा.
6) मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम
update ठेवले पाहिजे कारण मालवेअरचा मोबाईल
वर परिणाम कमी होतो.
7) थर्ड पार्टी ॲप स्टोअर मधून किंवा
कुठल्याही माहीत नसलेल्या वेबसाइटवरून ॲप डाऊनलोड करू नये .
8) बऱ्याच वेळेला आपण बँक अकाउंट नंबर,
पासवर्ड मोबाईल मध्ये सेव करत असतो हे सगळे कधीही एसडी कार्ड वर सेव्ह करू नये. मोबाईलच्या
इंटरनल मेमरी मध्ये सेव करा किंवा एका विशिष्ट फोल्डर बनवून त्याला पासवर्ड द्या.
मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली
आम्हाला जरूर कळवा आणि ही पूर्ण माहिती आपल्या मित्रांशी शेअर करा धन्यवाद!!!














