How to use whatsapp finger print
नमस्कार मित्रांनो आज आपण व्हाट्सअप मध्ये फिंगरप्रिंट कसे ॲक्टिवेट करावे या संदर्भात माहिती घेणार आहोत तर चला आपण हे फिंगरप्रिंट कसे ऍक्टिव्हेट करायचे या संदर्भात माहिती घेऊया1)आपले व्हाट्सअप ॲप ओपन करा ओपन झाल्यावर वरच्या बाजूला तीन डॉट दिसतील
2) तीन डॉट वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला सेटिंग हे ऑप्शन दिसतील .
3)सेटिंग ऑप्शन वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर अकाउंट ,चाट ,नोटीफिकेशन डाटा, स्टोरेज युजेस या पद्धतीचे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील यापैकी जे सुरुवातीचे ऑप्शन आहे ते म्हणजे अकाउंट यामध्ये प्रायव्हसी, सिक्युरिटी, चेंज नंबर अशा पद्धतीचे ऑप्शन दिसतील यामध्ये अकाउंट या ऑप्शनला क्लिक करा.
5)क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक नवीन विंडो मिळेल या विंडोमध्ये फिंगरप्रिंटलॉक Disabled
हे ऑप्शन तुम्हाला ऑन करायचे आहे
6)हे ऑप्शन ऑन झाल्यावर तुम्हाला तो विचारेल तुमच्या मोबाईलचा जो फिंगरप्रिंट सेन्सर आहे याला तुम्ही कुठला तरी एक फिंगर टच करा.
7)फिंगर टच झाल्यानंतर तुम्हाला परत एक नवीन विंडो मिळेल या विंडोमध्ये तुम्हाला तीन ऑप्शन्स दिसतील पहिला immediately दुसरा ऑप्शन असेल आफ्टर वन मिनिट तिसरा ऑप्शन असेल आफ्टर 30 मिनिट तर तुम्हाला जे योग्य वाटत असेल त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा .
8)आता व्हाट्सअप ऍप्लिकेशन क्लोज करा .क्लोज केल्यानंतर परत एकदा व्हाट्सअप ओपन करा तुम्हाला आता तो फिंगरप्रिंट विचारेल तुमचं जे बोट तुम्ही फिंगरप्रिंट साठी वापरलं असेल ते बोट फिंगरप्रिंट सेन्सर वर ठेवा म्हणजे तुमचं व्हाट्सअप ओपन होईल.
मित्रांनो हे जे अपडेट आहे हे अपडेट फक्त बीटा व्हर्जन साठी आहे लवकरच सर्व यूजर साठी हे अवेलेबल होणार आहे . आपल्याला हे आर्टिकल कसे वाटले आपल्या कॉमेंट्स कळवा धन्यवाद!











No comments:
Post a Comment